top of page

 कर्दळीवन सेवा संघ (About Us)

कर्दळीवन सेवा संघाची स्थापना १ एप्रिल २०१२ रोजी झाली. प्रा. क्षितिज पाटुकले यांनी "कर्दळीवन: एक अनुभूती" हे पुस्तक लिहिले आणि या निमित्ताने संस्थेची स्थापना केली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर पहिल्या तीन महिन्यातच या पुस्तकाचा ४० हजार प्रतींचा विक्रमी खप झाला. आजपर्यंत या पुस्तकाची २ लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. तसेच हे पुस्तक हिंदी, इंग्रजी, गुजराती, ब्रेल लिपी या भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. २०१३ पासून वाचकांच्या आग्रहामुळे कर्दळीवन पंच परिक्रमा आयोजित करायला सुरुवात केली. आंध्रप्रदेश राज्यामध्ये श्रीशैल्य पासून पुढे ४० किमी पुढे जंगलामध्ये ही अत्यंत कठीण परिक्रमा असूनही हजारों भक्तांनी ही परिक्रमा आमच्या बरोबर पूर्ण केली आहे.

प्रकाशन

"कर्दळीवन: एक अनुभूती" या पुस्तकाच्या यशानंतर प्रा. क्षितिज पाटुकले यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनाही वाचकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ४८ हून अधिक दत्त क्षेत्रांची माहिती देणारे "श्रीदत्त परिक्रमा", पांडव जेथून स्वर्गाकडे गेले त्या ठिकाणासंदर्भात तसेच हिमालयातील विविध साहसी आध्यात्मिक यात्रा-परिक्रमा यांची माहिती देणारे "स्वर्गारोहिणी", नक्षत्र आणि नक्षत्रवृक्ष याबद्दल संपूर्ण माहिती देणारे "नक्षत्रविज्ञान", "३ दिवसांची नर्मदा परिक्रमा" - उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा (गुजरात), कर्दळीवनाची परिक्रमा केलेल्या परिक्रमार्थींच्या अनुभवांचे संकलन असलेले "कर्दळीवन संजीवनी गाथा", जसा गुरु कुंभ राशी मध्ये गेल्यावर कुंभ मेळा असतो, त्याप्रमाणे गुरु कन्या राशीमध्ये गेल्यावर कन्यागत महापर्वकाळ असतो- या महापर्वकाळाची माहिती देणारे "कन्यागत महापर्वकाळ" ही प्रा. क्षितिज पाटुकले लिखित पुस्तके आणि पायी किंवा वाहनाने संपूर्ण नर्मदा परिक्रमा करु इच्छिणाऱ्या भक्तांसाठी मोहन केळकर लिखित "संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका" इ. धार्मिक आध्यात्मिक दैवी अनुभूती देणारी पुस्तके कर्दळीवन सेवा संघाने प्रकाशित केली आहेत. आमची प्रकाशने ऑनलाइन मागवण्यासाठी येथे क्लिक करा.

यात्रा-परिक्रमा

कर्दळीवन सेवा संघाचे यात्रा-परिक्रमा आयोजनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे "साहसी आध्यात्मिक यात्रा-परिक्रमा" ज्यामध्ये धार्मिक आध्यात्मिक उद्देशाबरोबर साहस आणि इच्छाशक्तीचीही गरज असते. नवनवीन जागृत ठिकाणे शोधून त्यांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना दैवी अनुभती याव्यात या उद्देशाने त्या ठिकाणाचे दर्शन घडवून आणणे या उद्देशाने आम्ही विविध वैशिष्ट्यपूर्ण यात्रा परिक्रमांचे आयोजन करतो. दरमहा असणाऱ्या यात्रा - दत्त धाम परिक्रमा, शनीपीठ परिक्रमा, स्वामीमठ यात्रा, संजीवन समाधी परिक्रमा, नक्षत्रवृक्ष परिक्रमा. विशिष्ट वेळी असणाऱ्या परिक्रमा - ३ दिवसांची नर्मदा परिक्रमा (चैत्र - मार्च, एप्रिल), विश्वरूप दर्शन पालखी परिक्रमा (वैशाख दशमी - एप्रिल/मे), अनसुया मेळा - तुंगनाथ, चंद्रशिला ट्रेक - हिमालय (दत्त जयंती - डिसेंबर). हिमालयातील परिक्रमा (जून ते सप्टेंबर) - स्वर्गारोहिणी यात्रा, आदि कैलास यात्रा, मणिमहेश कैलास यात्रा, श्रीखंड कैलास यात्रा, पंचकेदार यात्रा, पंच बद्री यात्रा, द्रोणागिरी पर्वत परिक्रमा. विदेशातील परिक्रमा - अंगकोरवाट विष्णू मंदिर - कंबोडिया सहल. सर्व यात्रांची माहिती, वेळापत्रक किंवा नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

आम्ही मुख्यत: कर्दळीवन परिक्रमा आयोजित करतो. परंतु सध्या तेथील वनातील आदिवासी लोकांच्या विरोधामुळे परिक्रमा बंद आहेत. पुन्हा सुरु होण्यासाठी कर्दळीवन सेवा संघाचे प्रयत्न चालू आहेत.

सामाजिक उपक्रम

कर्दळीवन सेवा संघाने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा आयोजित केले आणि करत असते. आत्तापर्यंत कर्दळीवन सेवा संघाने प्रत्येकी चार वेळा "घोरकष्टोधरण स्तोत्र महायज्ञ" आणि "श्री स्वामी तारकमंत्र महायज्ञ" हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये प. पू. टेम्ब्ये स्वामी महाराजांच्या घोरकष्टोद्धरण आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे ५१ वेळा सामूहिक पठण असा कार्यक्रम असतो. हे दोन्ही कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केले गेले आणि या प्रत्येक कार्यक्रमाला १००० हूनही अधिक भक्तांनी सहभाग घेतला होता.

नुकतेच कर्दळीवन सेवा संघाने २७ जागृत दत्त क्षेत्रांचे व्हिडिओ बणवण्याचा प्रकल्प केला. बऱ्याच भक्तांना काही मोजक्याच दत्त क्षेत्रांबद्दल माहिती असते. कर्दळीवन सेवा संघांने अनेक जागृत परंतु अपरिचित दत्त क्षेत्रांचे शुटिंग करून ते सर्वांना युट्युबवर पाहायला उपलब्ध करुन दिले आणि नवीन दत्त क्षेत्रे प्रकाशात आणली. दत्त क्षेत्रांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अजूनही जवळजवळ ७०-७५ दत्तक्षेत्रांचे चित्रीकरण करण्याचा संकल्प संघाने घेतला असून लवकरच नवीन ठिकाणांचे व्हिडिओ आमच्या Kardaliwan: A Divine Experience या युट्युब चॅनेल वर प्रसिद्ध होतील.

कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट अशी आमची संलग्न संस्था आहे. यामध्ये "द्रौपदीची थाळी" ही अन्नदान योजना आम्ही राबवत आहोत. कुणीही या अन्नदान योजनेमध्ये आपल्या इच्छेप्रमाणे अन्नदानासाठी निधी देऊ शकतो. या योजनेमार्फत विविध अनाथाश्रम/वृद्धाश्रम संस्थांना, खेडेगावातील गरीब विद्यार्थ्यांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान केले जाते. नुकत्याच कोरोना महामारीमध्ये कल्याण आणि डोंबीवली जवळील परिसरामधील गरजू कुटुंबाना या योजनेमार्फत अन्नदान केले होते. अधिक माहितीसाठी आणि अन्नदान करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या - www.draupadithali.org

कर्दळीवन सेवा संघाची व्हॉट्सअ‍ॅप लिस्ट आहे ज्यामध्ये आम्ही वेळोवेळी धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक उपयुक्त मेसेजेस पाठवत असतो. लिस्ट जॉइन करण्यासाठी आमचा 7057617018 हा क्रमांक सेव्ह करा आणि यावर Join KSS असा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवा. 

कर्दळीवन सेवा संघ, पुणे

६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, डेक़्क़न जिमखाना, पुणे - ४११००४

मो: ९६५७७०९६७८ / ९३७११०२४३९  फोन: ०२०-२५५३४६०१ / ०३७१

ईमेल : swami@kardaliwan.com

bottom of page